बाबलीपाडा सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहिसर युवक तालुका अध्यक्ष हरिष अनिल गायकवाड यांच्या द्वारे सरकारी कागदपत्र व सरकारी योजना यांचा कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्प मध्ये पॅन कार्ड ,आधार कार्ड , वोटिंग कार्ड ,सीनियर सिटीझन कार्ड, आयुष्मान भारत योजना, श्रम कार्ड, युनिवर्सल पास, फूल व्हॅक्सिनेशन पास, एम्प्लॉयमेंट कार्ड ही कागदपत्र बनविण्यात आली. कॅम्प मध्ये मी आणि माझे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नॅट चॅरिटेबल संस्था आयोजित गरजूंना धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला, त्यात ग्राहक सेलचे मुंबई अध्यक्ष विजय देसाईजी यांच्या नेतृत्वाखाली नवीन युवा ग्राहक सेल अध्यक्ष पदी जॅकब जॉन्सन यांची निवड करण्यात आली.
N L गार्डन जवळ आणि संत तुकाराम चौक येथे स्थानिक रिक्षाचालकांची गरजा व समस्या समजून घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष हरीश अनिल गायकवाड यांनी दोन नवीन रिक्षा स्टॅन्ड ची स्थापना केली.
Comments
Post a Comment